Posts

कविसंमेलनात विषमतेवर प्रहार, विटा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : नवोदित कवींच्या ज्वलंत प्रश्नावर कविता

विटा : आम्हाला आपापसात झुंजायला लावणारे ते लोक कोण होते? माणूस मारणारे ते लोक कोण होते? सत्यास जाळणारे व सामाजात चौफळी माजविणारे ते लोक कोण होते? विटा : आम्हाला आपापसात झुंजायला लावणारे ते लोक कोण होते? माणूस मारणारे ते लोक कोण होते? सत्यास जाळणारे व सामाजात चौफळी माजविणारे ते लोक कोण होते? मूल्यास गाढणारे ते लोक कोण होते? असे विविध सवाल करीत विटा (जि. सांगली) येथील कविसंमेलनात प्रसिध्द गजलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी, कोरेगाव-भीमा प्रकरणामुळे निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेवर भाष्य करीत प्रहार केला. विटा येथे रविवारी भारतमाता ज्ञानपीठ साहित्य सेवा मंडळ व मुक्तांगण वाचनालयाच्यावतीने आयोजित केलेल्या ३६ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सांगोलेकर बोलत होते. कविसंमेलनाचे सरस्वतीपूजन कविता चव्हाण व बाळकृष्ण चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. मोहनराव कदम, माधुरी कदम, सुधीर कुलकर्णी, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी, डॉ. ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर उपस्थित होते. कविसंमेल

भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर १७ फेब्रुवारीला पहिला मस्तकाभिषेक

कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सांगली : कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसह ४०० हून अधिक जैन मुनी, माताजींचे आगमन झाले आहे. मस्तकाभिषेक महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव तथा सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी बुधवारी सोहळ्याच्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात व स्वस्तिश्री जगद््गुरू चारूकीर्ती भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. ७ फेब्रुवारीला भगवान आदिनाथ मंदिराच्या पंचकल्याण महोत्सवाने सोहळ्याला सुरुवात होईल. १६ फेब्रुवारीपर्यंत पंचकल्याण महोत्सव चालणार आहे. त्यानंतर पहिला मस्तकाभिषेक १७ रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसोबत ४०० हून अधिक पिंच्छिधारी मुनी